|| मोक्ष ||

कधी रडत
कधी पडत
कधी पावसात ओले चिंब
तर कधी ताऱ्यांखाली आयुष्य ढकलत

आहेत खूप गोष्टी
काही तुझ्या – काही माझ्या
काही दुसऱ्यांच्या
तर वजा-बाकी आपल्या सर्वांच्या

लोभ नव्हे
प्रेम नव्हे
अहंकाराच्या वर्दचढ
मोक्षाचे वेड नव्हे

एव्हा दुःख
तेव्हा राग
सतत चालणारी आयुष्याशी झुंज
तर अधूनमधून मना-बाहेर डोकावणारा माज

हवी नको,
तुझी सहानुभूती
की नको,
तुझ्या उथळ काळजी चा ध्यास

सह्याद्रीची रांग मी
कौशल्याचा राम मी
सूर्य त्याची पहाट ही
आणि तळपत्या भगव्याची सोनेरी काठ ही मी

मी-पण नको
आपलेपण हवे
थंडगार पाण्याला
माठाचे टेकन जसे

सोडिले मग संसार मी
जसे डोळे सोडे घळ घळते अश्रू
संसार धरी आता आम्हा
जसे चिटके फुला पान्हा

मग काय?
आनंदी झालो मी
आनंदी झाला तू
आनंदी झाली ही दुनिया!

— नि.भो.


Comments

Leave a Reply

Discover more from Ni.Bho.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading