उत्तरेकडे खूप पाऊस पडला
ह्या वेळेस थंडी जास्त असणार
“आई sweater आणि hoodie काढून धुवून ठेव हं”
मी राहणार दक्षिण मुंबईचा
जिथे थंडीच्या नावाखाली फार तर फार baniyan घालून फिरावं लागणार
अरे पण पुण्यात तर जाम थंडी असणार ना
नुसता hoodie नव्हे तर full pant पण घाल
स्वप्नं फक्त आणि फक्त थंडीचीच
बसलो तर विचार येतात
मनाभोवती गोल करून उभे राहतात
एक विचार की – तुळशीचा रोप खूप दिवस झाले
कुठे दिसला नाही
दुसरा – concrete ला इतके तडे का जातात?
contractor नी नीट काम केलं नाही?
केस खूप पांढरे झाले आहेत
आता कात्रीने काम चालणार नाही!
पण आज संध्याकाळी पण तेच जेवण!
यार मला ते परत खायचा मूडच नाही
घरघर फिरणाऱ्या पंख्याला पण
कधी पाठवले पाहिजे सुट्टीवर
आई त्याचा motor
आणि वडील त्याची पवनचक्की
काय वाटत असेल त्याच्या घरच्यांना?
साला हा पण Mumbaiत struggling actor!
Iran ला bike trip वर गेलो तर…
मिळेल का माझ्या अ-गणित प्रश्नांची उत्तरं?
का यावं लागेल परत मला
मन भागवून फक्त Irani chaha
आणि Bun-maska वर?
आयुष्य एक रेषेसारखं असतं
एकदम सरळ किंवा वाकडी-तिकडी
किंवा अधूनमधून थांबत थांबत
ती रेषा कशी घडवायची
ह्याची Shaka-laka boom boom pencil तर माझ्याच हातात!
माझ्या मनाची दशा
आणि माझ्या मनाची दिशा
दोन्ही काही माझ्या बुद्धीच्या सध्या तरी आवाक्यात नाही!
-नि.भो.

Leave a comment